मराठी वाड्मयाचा इतिहास १: मराठी पुस्तक पीडीऍफ़ वर्णन | Marathi Vaadmayaachaa Itihas 1: Marathi Book PDF Description
श्रीनारायणाच्या कृपेनें-चिरसंकाल्पित ग्रंथमाळेचा हा पहिला खंड वाचकांच्या हातीं ‘देण्याचा आज सुयोग आला आहे. मराठी वाडूमयाचा संपूणे इतिहास आपण लिहावा हा संकल्प चांगला तीन तपांपूर्वीचा आहे. इ. स. १८९८ सालीं बी. ए. च्या परीक्षेला बसण्याच्या धांदळीत असतांना कोल्हापूरच्या ग्रैंथमालेंत “ मराठीभाषेचें स्वरूप ? या मथळ्याखालीं एक छोटासा निबंध मी लिहून प्रसिद्ध केला होता व त्यांत मराठी भाषेच्या इतिहासाचे १ ज्ञानेश्वरकाल २ एकनाथकाल ३ तुकारामरामदासांचा काल ४ मोरोपंतांचा काल व ५ मराठीगद्याचा उदयकाल असे पांच विभाग पाडले असून त्याचे शेवटीं ८० निवडक मराठी ग्रंथांची यादी दिला होती. तो निबंध म्हणजे प्रस्तुत ग्रंथमाळेचें बीजच होय. त्यानंतरच्या काळांत अनेकांकडून अनेक मराठी प्रंथांचें संशोधन शैछिं आहे, बरेचसे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत, वाडूमयाचें क्षेत्र व अभ्यास विस्तृत झाले आहेत, अनेक ग्रैथ व संशोधनात्मक आणि टीकात्मक लेख प्रसिद्धी पावले आहेत, व एकंदरींत मराठी वाडूमयाकडे पाहण्याची दश्रिही व्यापक झाली आहे. बिठूरायाची नगरी, भाग- वतधर्माचें आदिपीठ व मराठी वाड्मयाचें विश्वविद्याल्य असे जे पंढरपूर तेथें बी. ए. झाल्यावर माझें पांच वर्ये वास्तव्य झाल्यामुळें वाडूमयाच्या अंतरंगांत प्रवेश होऊन दृष्टि अधिक सोज्ज्वळ झाली व ज्या भूमिकेवरून संतवाड्मय निर्माण झालें त्या भूमिकेशी पुष्कळसें तादात्म्य झालें, ‘भक्तिमा्गप्रदीप’ तेथून उजळला गेला व मोरोपंती वाडूमयाचा संशोधनात्मक अभ्यास होऊन * मोरोपंतांचें चरित्र ) व ‘ मोरोपंती वेंचे हीं त्या अभ्यासास दोन फळें आलीं. अध्यात्म आणि भक्ति अथवा ज्ञानभक्ति हे. मराठी वाडूमयाचें हृदय असल्यामुळें त्याच्याशीं समरसता होऊन त्याचा छंद लागला व ह्या पवित्र वाड्मयाच्या सेवेस आयुष्य वाहण्याची श्रीहरीने भ्रेरणा केली. वाड्ययसेवा ही मी उपासनाबुद्धीनें अंगिकारली, गेल्या २५ वर्षोत मोरोपंत, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचीं चरित्रे लिहिलीं व मोरोपंती केचे, समथसंजीवनी, ज्ञानेश्वरांची प्रभावळ ३० अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले. त्या ग्रंथांची यादी प्रस्तुत प्रंथाच्या शेवटीं दिली आहे. हे सारे ग्रंथ लोकांपुढें आहेत. माझी वाढ्य़यसेवा जनीजनार्दैनाला निःसैदयय मान्य झाली आहे. उपासनाबुद्धीनें ग्रंथरचना करण्याचें काम नारायणानें मला दिलें आहे व त्यामुळें माझें जीवित सुखमय झालें आहे. व्यास,…